जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट ? राजेश टोपेंच धक्कादायक विधान

0
13

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कोरोना रुग्णसंख्या सध्या वाढत असताना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे. मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका मात्र कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरील आव्हान असल्याचंही राजेश टोपे म्हणाले आहेत. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेपासून दूर राहायचं असेल तर लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.

“जून, जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरत असल्याचं वाटलं तर लसीकरण यामधून तारणार आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं महाराष्ट्रासमोर महत्वाचं काम असणार आहे. आरोग्य विभाग याबाबतीत अत्यंत सजग आणि जागरुक राहून लसीकरणाचं काम करत आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

मुंबईची सदस्थिती : 

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मुंबईतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही वर गेले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून निश्चितच मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. याआधी शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली होती. नंतर ही रुग्णसंख्या साधारण ५० च्या घरात आली; परंतु तिसऱ्या आठवडय़ापासून रुग्णसंख्येत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आणि ही वाढ पुढे कायम राहिली आहे. परिणामी, आता दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्याही पुढे गेली आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण लक्षणविरहित आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. तसेच मृत्यूही जवळपास शून्य आहेत. तेव्हा सर्वेक्षणावर सध्या अधिक भर दिला जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here