जि.प. सदस्या डॉ.नूतन आहेर यांच्या हस्ते वाखारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

0
34

देवळा प्रतिनिधी : जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतन सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून वाखारी येथे वाखारी-पिंपळेश्वर या ग्रामीण रस्त्यावर फरशी पूल बांधणे, सार्वजनिक मुतारी व शोषखड्डा या कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील गोटूआबा आहेर हे उपस्थित होते.

प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी निंबा सूर्यवंशी यांनी केले यावेळी उपसरपंच डॉ. संजय शिरसाट ग्रा.पं. सदस्य नितीन ठाकरे, विलास पवार, रमण खरे, माजी सरपंच नामदेव जगदाळे, साहेबराव पवार, शांताराम ठाकरे, शिवादादा जाधव, बाबुराव गुंजाळ, संजय शिरसाट, श्याम पवार, राकेश ठाकरे, अशोक आहिरे, रामा जिभाऊ, रवी चव्हाण, लखन जगदाळे, महेश जगदाळे, मुन्ना पवार, कैलास भदाने, आबा ठाकरे, बाळू बच्छाव, अंबादास गुंजाळ, गणेश भदाणे, मनीष जगदाळे, नानाजी पवार, कमलेश भालेराव, शैलेश शिंदे, शुभम शिंदे आदी नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here