अंकुश सोनवणे
द पॉईंट नाऊ मीडिया : पंचायत राज समिती नाशिक जिल्ह्यात येण्याच्या आधीच जिल्हापरिषद अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनकडून पैसे जमा करण्यात आले. भ्रष्टाचार झाकण्यासाठी हा सर्व निधी एकत्र झाल्याची चर्चा सुरू झाली. शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्हिडीओ बनवून अक्षरशः प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगले, मात्र गेंड्याच्या कातडीच्या यंत्रणेला याचा साधा फरकही पडला नाही. पालकमंत्रीसह पुढाऱ्यांनी मात्र चुप्पी साधली. भ्रष्टाचाराच्या विरोधात दुसरं कोणी चकार शब्द काढला नाही. हे जनतेच्या मात्र लक्षात आले.
गेल्या दोन दिवसांपासून आहेर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला यामुळे हा लाखोंचा भ्रष्टाचार बाहेर आला. पंचायत राज चे मूळ उद्दिष्टे बाजुला राहिल्याचे चित्र आहे. ज्या शिक्षकांकडून ज्ञानाचे धडे मिळायला हवेत त्यांच्याकडून मात्र पैसे जमा झालेत. ग्रामसेवकांनी त्यांच्या गावाचा विकासात कसूर केली म्हणून त्यांनी पण पैसे देऊन भ्रष्टाचाराचे भागीदार झालेत का असे प्रश्न उपस्थित होतात .
पंचायत राज समितीच्या पहाणी दरम्यान त्रुटी निघाल्यात मात्र ठोस कारवाई कुठं झाली हा प्रश्न अनुत्तरित राहिला. जर समित्या येऊन सोपस्कार पार पाडणार असतील तर असल्या समित्या हव्यात कशाला हा प्रश्न आहे. नेमका हा पैसा कोणासाठी जमा झाला ? या कुरणावर कोणी कोणी हात टाकला याची चौकशी होऊन समोर येन गरचेच आहे.
भ्रष्टाचाराची कीड अशी पसरत असेल तर मोठ्या प्रमाणात भविष्यात हे महागात पडू शकत. पुढाऱ्यांनी काम करायची नाहीत समिती आली की असले पैसे जमा करून कुणाच्या माथी मारायचे. जेणेकरून भ्रष्टाचार करणाऱ्यांची हिम्मत वाढत जाईल या सर्व बाबींना आळा घालणे गरजेचं आहे.
उदयकुमार आहेर यांच्यामुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने जिल्हा परिषदेच्या काळ्या कारनाम्यांची पद्धत पुन्हा समोर आली. हे प्रकरण इतकं गंभीर असतांना सर्व राजकीय पक्ष मात्र गप्पच राहिले कोणीही याकडे लक्ष दिले नाही. यामुळे यात सर्व्यांचा वाटा होता का असा सवाल सोशल मीडियावर सुरू होता.
मीडिया देखील गप्प यावर बोलणार कोण ?
विशेष म्हणजे सर्व माध्यम त्यात वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्व अतिशय गप्प राहिले, काही अपवाद वगळता या इतक्या गंभीर विषयाला प्रस्थापित मीडियाने दुर्लक्षित केल्याने सर्व्यांच्या भुवया उंचावल्या. मीडिया जर अस पाठीशी घालणार असेल तर जनतेने कोणाकडून अपेक्षा करावी हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
लेखा संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा
ankushsakal1793@gmail.com
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
या प्रकरणाची पोलखोल झालीच पाहिजे