नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजपा एक नंबरचा पक्ष राहिला मात्र, नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण व निवडीची तारीख जाहीर झाल्याने राजकीय हालचालीना वेग आला आहे. यात पण भाजपा नंबर एक राहणार का याकडे लक्ष लागून आहे. निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भात बैठका व बोलणी सुरू झाल्याने पेठ, दिंडोरी व कळवणला महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष तर देवळा नगरपंचायत भाजपाचा नगराध्यक्ष होण्याची चिन्हे आहेत. सुरगाण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून माकपाला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
पेठ नगरपंचाय मध्ये रंगतदार लढत झाली, असून शिवसेनेची सत्ता उलथून लावली आहे. स्थानिक ठिकाणी राष्ट्रवादी सेना यांच्यात विळ्याभोळ्याचे नाते असल्याने राष्ट्रवादी सोबत न जाण्याची भूमिका सेनेने सध्या घेतली आहे. पेठला आजवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र ते संपुष्टात आले आहे
देवळा येथे भाजपाने बहुमत मिळविले असल्याने या ठिकाणी विरोधकांचा सुपडा साफ आहे. नगराध्यक्षपदाची माळ केदा आहेर कोणाच्या गळात टाकतात, याकडे लक्ष लागून आहे, निफाडला शिवसेना व शहर विकास या आघाडीकडे बहुमत आहे. यामुळे या दोघा ठिकाणी मार्ग मोकळा आहे.
१५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदाची निवड होणार असून, त्यासाठी मंगळवार (दि.८) पासून नामांकन भरण्यास सुरुवात होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम