येवला प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यासाठी दुःखद घटना घडली असून येवला तालुक्यातील चिचोंडी गावचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, मेजर नारायण मढवई यांना देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नशिक जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यासाठी दुःखद घटना घडली असून शेतकरी कुटुंबातील युवक सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावल्याची भावना सर्वत्र आहे.
या युवकाच्या निधनाने मढवई कुटुंबासोबतच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला भुजबळ कुटुंबीय शहीद जवान मेजर नारायण मढवई यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. अशी प्रतिक्रिया मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम