द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; श्री राजे छत्रपती सामाजिक, शैक्षणिक संस्था व संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा गोदा गौरव पुरस्कार सहकार क्षेत्रात येथील जाणीव पतसंस्थेचे चेअरमन जितेंद्र आहेर यांना जाहीर झाला आहे .
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ४.३० वाजता कालिदास कला मंदिर नाशिक येथे होणार आहे . राष्ट्र संत श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अनुयायी जेष्ठ समाजसेवक कै निवृत्तीराव दादाजी बर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व समाजसेवक स्व शंकरराव बर्वे सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज जीवनगौरव व कर्मयोगी निवृत्ती दादा बर्वे गोदा गौरव पुरस्काराचे वितरण श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश बर्वे यांनी दिली.
देवळा येथील सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जितेंद्र आहेर यांना गोदा गौरव सहकार पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार डॉ राहुल आहेर , भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर , भाऊसाहेब पगार , लक्ष्मीकांत आहेर ,अतुल पवार , अशोक आहेर ,किशोर चव्हाण, कैलास देवरे , संजय कानडे , तुषार वाघ आदींनी अभिनंदन केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम