देवळा प्रतिनिधी ; देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी भारतीय संविधानाचे वाचन केले.याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रतिभा सागर , सुमेरसिंग ठोके आदींसह शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो.असंख्य भाषा,जाती,पंथ,धर्म,असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय,समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. त्यामुळे आपण ‘प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय आहोत’.
२६ नोव्हेंबर १९४९ पासून भारतीय संविधान लागू करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे,मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे या करिता संविधानाची माहिती,त्यातील मुलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. या उद्देशाने शासना मार्फत भारतभर दि.२३ ते २६ नोव्हेंबर २०२१.या कालावधीत सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर वक्तृत्व, रांगोळी,चित्रकला, निबंधलेखन,पोस्टर,व फलक लेखन घेऊन “माझे संविधान,माझा अभिमान” हा उपक्रम राबविला जात आहे.
संविधान दिना निमित्त जनजागृती तसेच संविधाना विषयी प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने कलाशिक्षक भारत पवार यांनी रंगीत खडूने मनमोहक चित्र रेखाटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम