द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारतात (India) सध्या सर्वसामान्य जनता महागाईने पुरती त्रस्त झाली आहे. खाद्य तेलापासून ते इंधन तेलापर्यंत (Crued Oil) सारे काही महागले आहे.
कोरोनाच्या (Cowid) प्रकोपाने सगळ्या देशाचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता केंद्र सरकारने आरोग्य सेवेबाबत काहीसा दिलासा दिला आहे. ३५ हुन अधिक प्रकारच्या औषधांच्या (Medicine) किंमती कमी केल्या जाणार आहेत. त्यात कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes), टीबी (TB) आदी आजारांवरील औषधे स्वस्त केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किरकोळ का असेना, सामान्यांना निदान आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत तरी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे.
भारतात सध्या खाद्यतेल हे १६०-१७० रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. तर पेट्रोल – डिझेल (Petrol – Diesel) ने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आधीच सर्वांचे उदर निर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि त्यात महागाईने मोठा आ वासल्याने सामान्य नागरिक पुरता हवालदिल झाला आहे.
खाद्यतेल, इंधन, गॅस अशा अनेक गोष्टी महाग झाल्या असल्याने, केंद्र सरकार बाबत सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. इंधनावरील टॅक्स (Tax)कमी करण्याची मागणी केली जात आहे.
आरोग्य क्षेत्रात मिळालेली ही काहीशी सूट कुठेतरी फुंकर मारण्याचाच प्रयत्न आहे, अशी चर्चा घडू लागली आहे.
मात्र या अशा फुंकर मारण्याने काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या प्रकोपा नंतर आरोग्य क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली होती. हॉस्पिटल्स (Hospitals) द्वारे अव्वाच्या सव्वा प्रमाणात नागरिकांकडून पैसा उकळला जात होता. मात्र कालांतराने शासनाने कोरोनाच्या इलाजावर दर निश्चित करून दिल्याने, सामान्यांना थोडा दिलासा मिळाला.
आता कर्करोग, मधुमेह आदी आजारांवरील औषधे स्वस्त करण्यात येणार असल्याने, इथेही काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. इंधनाचे दर ही लवकर कमी करावेत अशी मागणी ही आता जोर धरू लागली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम