जास्त वेळ फोन वापरताय ? ; ही सवय आरोग्यास धोकादायक

0
5

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : जर तुम्ही फोनवर तासन्तास समाजमाध्यमांवर वेळ घालवत असाल. स्क्रोल करत असाल, ठरवलेल्या कामांना विलंब करत असाल, आपली झोप बाजूला ठेवून, थेट व्यक्तिगत संवाद, सामाजिक वावर बाजूला ठेवून ‘स्क्रोल’ करत असाल, तर तुम्ही ‘डूमस्क्रोलिंग’ला (विनाकारण फोन पाहत राहण्याची सवय) बळी पडले आहात, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुमचा वेळ आणि निद्रेवरही मात करणारी अशी ही सवय आहे.

या सवयीमुळे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. चिंताग्रस्तता निर्माण होऊन ती वाढत जाते. ताण, नैराश्य, अस्वस्थतेतही भर पडते. जर वेळीच ही सवय रोखली नाही तर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा मोठा धोका असतो. त्याने शारीरिक व्याधीही जडतात, असे तज्ज्ञ सांगतात.

सतत मोबाइलमध्ये पाहात राहिल्याने ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलिसिस’सारखे मानेचे विकार होतात. ‘सर्फिग’ करताना एका जागी खूप वेळ एकाच स्थितीत बसल्याने मणक्यांचे विकार किंवा संधिवात होण्याचा धोका वाढतो. तसेच हाताचा पंजा व हात बधिर करणारा ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’, स्थूलत्व, दृष्टिविकार असे विविध विकार या सवयीने मागे लागण्याचा धोका असतो. दोन वर्षांत असे विकार वाढल्याची आकडेवारी एका पाहणीत दिसली. रेडिओलहरींच्या सतत संपर्कात राहिल्याने मेंदूत गाठ होण्याचा धोकाही वाढला आहे. ‘यूटय़ूब व्हिडीओ’, ‘रील्स’च्या चित्रफिती, स्टोरी, न्यूज, सेलिब्रिटी चित्रफिती आदींच्या मोहमयी, अंतहीन कृष्णविवरात तुम्ही अडकला आहात, याची तुम्हाला जाणीव झाली असल्यास, या सवयीविषयी आपण अधिक सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचा दीर्घकालीन मानसिक आणि मेंदूच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका आहे. आपला फोन पाहण्याची विशिष्ट वेळ ठरवून घ्या. दैनंदिन व्यायामानंतर, कामादरम्यान घेतलेल्या ‘ब्रेक्र’मध्ये किंवा तुमच्या सोयीची एखादी वेळ निवडा. त्या वेळेव्यतिरिक्त तुमचा फोन पाहण्याचा मोह टाळा. सकाळी उठल्यानंतरचा वेळ ध्यानधारणा, प्रार्थना, व्यायामासाठी द्या. रात्रीपासून सकाळपर्यंत फोनपासून लांब राहणे सर्वार्थाने हितावह आहे. आपल्या फोनपासून ‘डिसकनेक्ट’ होऊन निसर्गाशी ‘कनेक्ट’ व्हा, त्यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here