जाणता राजा मित्र मंडळाचे ई-पिक ॲपच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; स्वराज्याचे सर्वस्व पणाला लावणारे शुरवीर योद्धा जीवा महाला यांच्या स्मरणार्थ उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतक-यांना ७/१२ वर पिक पाहणी लावण्यासाठी ई-पिक पाहणी ॲप सुरु केले आहे. या ॲपच्या माहिती पत्रकाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला.

 

उमराणे येथे ई पिक पहाणी अँपच्या माहिती पत्रकाचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित नायब तहसीलदार काथेपुरे ,नंदन देवरे ,विलास देवरे आदिंसह शेतकरी (छाया – सोमनाथ जगताप )

उमराणे पंचक्रोशीत गेल्या अनेक वर्षांपासून जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक क्षेत्रात विविध उपक्रम अखंडपणे राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणुन शेतकरी वर्गासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय पीक पाहणी या वर्षांपासून राज्य शासनाने २०२१-२०२२ या महसुली वर्षा पासून ७/१२ वर पिक पाहणीची नोंदणी फक्त मोबाइल मध्ये ई-पिक पाहणी अॅपच्या माध्यमातून होणार आहे.

त्यामुळे प्रत्येक शेतक-याने स्वतः आपल्या मोबाइलमध्ये ई-पिक पाहणी ॲप स्थापित करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲप मध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरून पिकाचा फोटो काढून भरावयाचा आहे त्यामुळे शेतक-यांना याबाबत सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने जाणता राजा मित्र मंडळाने ई-पिक पाहणी ॲप ची संपूर्ण माहिती असलेले पत्रक उमराणेचे भूमिपुत्र उद्योजक कैलास देवरे यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ई-सेवा केंद्राचे संचालक देवा पगार हे होते.

ई-पिक पाहणी ॲप संदर्भात मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी मोबाइल द्वारे पिक पाहणी कशी करावी अशा माहितीचे पाच हजार पत्रक शेतक-यांच्या घरोघरी येत्या ७२ तासांच्या आत पोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे , नायब तहसीलदार काथेपुरे व मंडळ अधिकारी बागुल रावसाहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, शेतकी संघाचे चेअरमन संदीप देवरे, वसाकाचे माजी संचालक बारकू देवरे, माजी सरपंच दत्तू देवरे, ई-सेवा केंद्राचे संचालक जयवंत पाटील, भिला देवरे, सावंत सर, बापु तात्या, कौतिक आप्पा, ललित देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, संतोष देवरे, बाळा पवार, तात्या देवरे, आनंत देवरे, शांताराम देवरे, सुनील देवरे, भुषण देवरे, पप्पू पवार, वैभव देवरे, तुषार देवरे, संदीप शिरुडे, रतन देवरे, संदीप पगारे, बंडू देवरे, सचिन देवरे, शिवराजे देवरे, हर्षल कापडणीस, भाऊसाहेब पाटील, अंकुर देवरे, संजय सुतार, अरुण पेंटर, नाना वतनदार आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here