जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने उमराने गावात रस्ते दुरुस्तीचे काम हाती

0
40
उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याचे काम

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; हिंदवी स्वराज्य संकल्पक स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या स्मरणार्थ येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी राजे मार्गापासून (आईमरी पांदी) ते स्वर्गीय हरी देवराम देवरे यांच्या निवास स्थानापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने उमराणे मावळ खो-यात प्रत्येक क्षेत्रात समाज उपयोगी उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणुन मंडळाच्या वतीने शिवकालीन रायगड किल्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर रस्ता दुरुस्ती अभियान सुरु करण्यात आले असुन गाव व परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे.

उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्याचे काम

त्या अंतर्गत उमराणा गावातील छत्रपती शिवाजीराजे मार्ग (आईमरी माता मंदिर)ते स्वर्गीय हरी देवराम देवरे निवास स्थाना पर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.

हि बाब लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने हिंदवी स्वराज्य संकल्पक स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्मरणार्थ या रस्त्याच्या दीड किलोमीटर लांबीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले आहे.सदर या रस्ता दुरुस्तीच्या कामाबाबत ग्रामस्थांनी जाणता राजा मित्र मंडळाचे कौतुक केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here