देवळा महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त देवळ्यात वृक्षारोपण करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत शिक्षक व विध्यार्थी ( छाया - सोमनाथ जगताप )
देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात शुक्रवारी ( २२ ) रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले .
देवळा महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त देवळ्यात वृक्षारोपण करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत शिक्षक व विध्यार्थी ( छाया – सोमनाथ जगताप )
सुरुवातीला जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व समजावून सांगताना वृक्षांचे महत्त्व,पर्यावरण रक्षण,जैवविविधता, जागतिक तापमान वाढ व जलसंवर्धन याबाबत स्वयंसेवकांना वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व रा.से.योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.के.आहेर यांनी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी क्रीडा संचालक प्रा.पी.एन.ठाकरे,कनिष्ठ विभाग रा.से.यो.प्रमुख अशोक गुजरे,वृक्षमित्र सुनील आहेर, डॉ.डी. एम. सुरवसे, प्रा.महेश वळवी, प्रा. राहुल पवार, माजी कार्यक्रम अधिकारी आर.एन.शिरसाठ, गोरख कारवाळ, दिपक बोरसे आदींसह रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा