जयवंत निंबाजी ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
14

स्वप्निल अहिरे, प्रतिनिधी : जयवंत निबाजी ठाकरे, रयत शिक्षण संस्था शाखा आसखेडा ता बागलाण येथे कार्यरत. जन्मभूमी खाकुर्डी, ता. मालेगांव या गावातील प्रतिष्ठित प्रथम नागरिक निंबाजी पाडूरंग ठाकरे. वडिलांनी विविध पदावर सामाजिक कामे केली आहेत. त्यांचे भाऊ संजय व विनोद हे हि गाव व परिसरात सामाजिक कामात अग्रेसर असतात व आई आदर्श मातेच्या रुपात. कुटुंबातील सर्व सदस्य येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या, सुख दुःखाच्या वेळी हजर आहे.

या सर्व सहकाऱ्यांच्या आशिर्वाद व साथीने शिक्षण क्षेत्रात बुध्दीचे जोरावर गेल्या वीस वर्षापासून अखंड काम करत आहे. सन १९८६ या वर्षात दहावीत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही प्रथम क्रमांक पटकावला होता. नंतर आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केले नंतर प्रथम नियुक्ती काळात झालेल्या जखमेतून सावरुन आई वडिलांच्या प्रयत्नशील पणाला यश आलं व नशीब उज्वल असल्याने महाराष्ट्र राज्यातील अग्रेसर शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेस आई समान मानले व स्वतः मधील ठासून भरलेली शैक्षणिक पात्रता चमकून उठली ती अजूनही चमकत आहे.

गेल्या वीस वर्षांपासून ठाकरे सर अशी ओळख निर्माण करून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण व गुणवत्तावाढीसाठी ऊलेखनिय काम करत आहेत. स्कॉलरशिप, एन एम एम एस अशा परीक्षेत ईयता दहावीचे अनेक विद्यार्थ्यांना भुमिती व सायन्स विषयात ऊत्तर महाराष्ट्र विभागात प्रथम आणले. आंतरराष्ट्रीय, पातळीवर तीन वेळा संशोधन प्रकल्प प्रकाशित केले आहे व पर्यावरण विभागात राज्य पातळीवर सहभागी केले. व गेल्या नऊ वर्षे पासून महाराष्ट्र पर्यावरण विभाग सेवा प्रमुख म्हणून काम करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात, गावपातळीवर पर्यावरण बाबत उत्तम प्रकारे काम करत आहेत. आणि याचीच फलश्रुती म्हणून २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सृष्टी मित्र पुरस्कार मिळाला आहे. नंतर महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये राज्य आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेे. महाराष्ट्र शासनाने नवोप्रकमशील शिक्षक म्हणून पुरस्कार प्रदान केला आहे. असे आठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, रयत शिक्षक बँकेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार केला आहे.

आदर्श सायन्स शिक्षक पुरस्कार, आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आता या सुपुत्राने शासन व शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत पंचवीस पुरस्कार प्रदान केले आहेत. अशा गुणवंत, नामवंत, शिलवंत, मायाळू, कणखर, रागट व दानशूर मित्राने आपल्या लाडक्या बहिणीला करोणा काळात गमावले आहे. दुखं विसरून जावे लागते. नुकताच शासनातर्फे राज्याचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here