जम्मू – काश्मीरमध्ये नमाजानंतर गोंधळ , आंदोलकांकडून जवानांवर दगडफे

0
38

मुंबई प्रतिनिधी : आज रमजान ईदच्या मौक्यावर संपूर्ण देशभरात उत्साह पाहायला मिळतोय . देशभरात जोश्यात ईद साजरी केली जात आहे . परंतु जम्मू- काश्मीर मध्ये मात्र या सणाला गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले . 

 जम्मू-काश्मीर मध्ये ईदच्या नमाजासाठी अनंतनागमध्ये असलेल्या मशिदीत लोक जमले असता नमाजा नंतर काही लोकांनी अचानक रस्त्यावर येऊन जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी करत मिशदी समोर तैनात असलेल्या जवानांवर दगडफेक केल्याचे समोर आले आहे  . तर दगडफेकी नंतर परीसरातील बंदोबस्त वाढवला असून , परीस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे . एकंदरीतच संपूर्ण प्रकरणामुळे परीसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते .

जोधपूर मध्येही दगडफेक

तर राजस्तानच्या जोधपूरमध्येही असाच प्रकार घडल्याचे पहायला मिळाले . दोन गटातील वादानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली . घटनेत काही पोलिसही जखमी झाले . तर पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देत लाठीचार्ज करून , गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराचा ही वापर केला . सध्या परीस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा निर्बंध वाढवण्यात आला असण्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here