छ. संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत समाधी स्थळापर्यंत बाईक रॅली

0
26

देवळा प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून त्यांच्या वढू (पुणे) येथील समाधीस्थळाच्या दर्शनासाठी तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील युवा शिवशंभूप्रेमी कार्यकर्ते मोटारसायकलने रवाना झाले. यावेळी देवदारेश्वरचे गणेशानंद पुरीजी महाराज, ज्येष्ठ नागरिक एन.डी.पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, नदीश थोरात आदी नागरिक उपस्थित होते.

पिंपळगाव येथील गावाच्या वेशीजवळ शिवशंभूप्रेमीचे औक्षण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित गणेशानंद पुरीजी महाराज,नदीश थोरात ,दिलीप पाटील आदी .(छाया – सोमनाथ जगताप )

येथील महिलावर्गाने औक्षण करुन मोटरसायकल रॅलीला शुभेच्छा दिल्या. देवळा येथील शिवस्मारक परिसरात आलेल्या रॅलीतील युवकांना उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संजय आहेर, नगरसेवक अशोक आहेर डॉ.रमनलाल सुराणा, योगेश आहेर, करन आहेर, किशोर आहेर, आदींनी यांनी भेट देऊन स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज यांचे धर्म व स्वराज्याच्या रक्षणासाठी मोठे योगदान असून त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना कळावी याउद्देशाने तालुक्यातील शिवशंभूप्रेमी कार्यकर्ते दरवर्षी फाल्गुन अमावास्या या तिथीला वढूबुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथील संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी जातात.या रॅलीत लक्ष्मीकांत पाटील, विश्वास पाटील, राहुल पाटील, पवन बोरसे, उमेश थोरात, संदीप पाटील, समाधान ठाकरे, अमोल ठाकरे, अर्जुन कदम, नंदू निकम, शामभाऊ सूर्यवंशी, वैभव वाघ आदीं कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

” मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलीदानापासून प्रेरणा घेवून युवावर्गाने स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपले योगदान द्यावे यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टीने हा आमचा प्रयत्न आहे.”
– लक्ष्मीकांत पाटील, पिंपळगाव (वा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here