द पॉईंट नाऊ ब्युरो : छत्रपती शिवाजी महाराज यांचं केवळ नाव घेतलं तरी सर्वांच्या अंगातील रक्त सळसळायला लागतं. याच छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आज संपूर्ण जगभर उभारले गेले आहेत.
त्यात आता एक विशेष आणि अभिमानास्पद बाब घडली आहे. जगातील सर्वात उंच असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आहे. भारताच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात हा शिवरायांचा पुतळा उभारला आहे. पुण्यातील मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी हा पुतळा तयार केला आहे.
इथे नियंत्रण रेषेजवळ जवळपास 15 हजार फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आहे. शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा आहे. जगातील कोणत्याही ठिकाणी सर्वाधिक उंचीवर स्थापित केला गेलेला शिवरायांचा पुतळा आहे.
मराठा रेजिमेंटद्वारे स्थापित केल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याने सर्वांची छाती देखील अभिमानाने फुगली असल्याच्या भावना उमटत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम