डोंबिवलीमध्ये येथे चोरी करण्याच्या नादात दोन तरूणांना घडली आयुष्यभराची अद्दल. चोरी करण्याच्या प्रयत्नात बेत चुकल्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन एका तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला. तर त्याचा साथीदार जखमी झाला आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना घडली. मोहम्मद भाटकर आणि पिंजारी दोघे असे दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत.
डोंबिवली इथल्या केडीएमसीच्या बीएसयूपीच्या इमारतीचे वायरिंग चोरी करण्यासाठी दोन तरुण आले होते. काही वेळाने वॉचमनला संशय आल्याने इमारतीमध्ये गेला. वॉचमनची चाहूल लागताच चोरटी घाबरून इमारतीच्या पाईपवरुन खाली उतरण्याचा प्रयत्नात आठव्या मजल्यावरुन दोघे खाली पडले. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. मोहम्मद सलिम भाटकर अस या मृत तरुणाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार होता.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने इमारती उभारल्या आहेत. मात्र अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा दिला नाही. गेल्या काही महिन्यापासून या इमारतींना चोरट्यांनी वेढले आहे. चोर या इमारतीच्या दरवाजे ग्रील चोरुन नेतात. अशाच प्रकारची चोरी करण्यासाठी दोन चोर इमारतीत गेले होते. घटनास्थळी पोलिसांनी दखल घेतली या आधी देखील २ चोरट्यावर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम