द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे चॉकलेट खाल्ल्याने चार मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कसया पोलीस ठाणे हद्दीच्या सिसाई गावात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
एका व्यक्तीने रस्त्यावर फेकून दिलेले चॉकलेट उचलून या मुलांनी खाल्ले. एका घरातील तीन आणि दुसऱ्या एका घरातील एक अशा चार मुलांनी चॉकलेट खाल्ल्या आणि त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी मुलांच्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
चॉकलेट हा मुलांचा आवडता भाग आहे. त्यांना चॉकलेट खाण्यास खुप आवडते. मात्र या चारही लहानग्या जीवांचा चॉकलेटनेच घात केला. आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम