चेहरा ‘भोळा’ अन लफडे ‘सोळा’ , महाराज तुमच्याबद्दल हे काय ऐकतोय आम्ही…!

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : गेल्या चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती, त्यांच्या आत्महत्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले गेले. प्राथमिक तपासात हे प्रकरण साधारण असेल अस वाटत होतं. मात्र हे अंदाज सर्व चुकले असून तेव्हाचे पहिले इन्वेस्टिगेशन ऑफिसर असलेले CSP मनोज रत्नाकर यांनी घरगुती विवादातून सुसाइड केल्याचा रिपोर्ट सादर केला होता. फाइल बंद करण्याची तयारीही सुरू झाली होती. मात्र यात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

हे प्रकरण मिटत असतांना दोन महिन्यांनंतर महाराजांच्या जवळचे वकील निवेज बडजात्या यांना 5 कोटींच्या खंडणीचा कॉल आला. आणि हा धमकीचा कॉल एकेकाळी महाराजांचा ड्रायव्हर असलेल्या कैलास पाटील याने केला होता. या कॉल मुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी महाराज यांची सेवा करणारा विनायक, शरद आणि शिष्या पलक यांच्यातील अनैतिक संबंधाचा खुलासा झाला. त्यानेही हे मान्य केलं की, अनेकदा महाराज्यांच्या गाडीतून पलक हिला घरातून आश्रमात आणण्याचं काम केलं आहे.

पलक सोबत झालेल्या संवादातून गाडीमध्ये ती जे काही विनायक आणि शरदशी बोलत होती, ते त्याच्या लक्षात आहे. याच्या आधारावर पोलिसांनी तीन आरोपी शरद, विनायक आणि पलक यांचा जबाब नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी जबरदस्ती करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं की, महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध होते, यातील 2 तर आयएएस आहे. यासंदर्भात दैनिक भास्करने वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली.

महाराजांचा चेहरा भोळा अन लफडे 16 या म्हणीला तंतोतंत उतरल्याचे समोर आले. भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांनी काहीच सुगावा लागत नव्हता. तत्कालीन DIG हरिनारायण चारी मिश्र (सध्याचे इंदूर पोलीस कमिश्नर) यांचे या प्रकरणात लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. महाराजांची फाइल बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसानेच महाराजांच्या सुसाइडच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक केली. व सर्व घडामोडी समोर आल्याने पुन्हा खळबळ उडाली.

महाराजांना मनांनारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे , संपूर्ण देशात त्यांचा चाहता वर्ग आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचे उठनेबसने हायप्रोफाईल होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here