द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारावर जगभरातील फक्त दोनच लस प्रभावी आहेत. असे संशोधनातून समोर आले आहे.
सध्या जगभरात कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जगभरात बऱ्याच देशांत लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
त्यात कोरोनाच्या अटकावासाठी जगभरात अनेक प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या. ज्यांद्वारे लसीकरण सुरू झाले. मात्र कोविशील्ड, कोव्हॅक्सीन, जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या सर्वच लस या ओमीक्रॉनवर काहीही प्रभाव पाडू शकत नाही. असे धक्कादायक संशोधन समोर आले आहे.
ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारावर केवळ मॉडर्ना, फायझर याच लसी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. म्हणून या दोन लसिंबाबत चांगली बातमी असली, तरी इतर सर्व लसिंबाबत मात्र चिंता वाढवली आहे.
सध्या जगभरात लसीकरण सुरू आहे. त्यात ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंट ने डोकेदुखी वाढवली आहे. हा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंट पेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नसतांना, कोरोनाच्या या नव्या प्रकाराने चिंता वाढवली आहे.
त्यात आधी ज्या लसिंद्वारे लसीकरण करून घेतले. त्या लस केवळ नव्या व्हेरिएंट पासून अधिक आजारी पडण्यापासून वाचवू शकतात. मात्र संसर्गापासून रोखू शकत नाहीत. असे प्राथमिक संशोधनात निष्पन्न झाले आहे.
आता या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी अजून काय उपाययोजना केल्या जातात? की आधीच्या लसींमध्ये अजून काही संशोधन करून त्या अधिक प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या नवीन संशोधनातून एक बाब लक्षात आली आहे. ती ही की, लसीकरण करून घेतले असले, तरी लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
फायझर आणि मॉडर्ना या लसी सोडल्या तर इतर लसी या ओमीक्रॉन वर अधिक प्रभावी नसल्याने, आता लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण भारतात कोव्हॅक्सीन, कोविशील्ड याच लसिंद्वारे अधिक लसीकरण झालेले आहे.
आता यापुढे अजून काय संशोधन केले जाते? हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम