चिंचबारी घाटातील रस्ता खचला ; ढगफुटी सदृश्य परिस्थिती

0
49

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील पूर्व भागात वाखारी चिंचबारी परिसरात शुक्रवारी( दि ८) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला . जवळपास एक तास भर झालेल्या पावसामुळे चिंचबारी घाटातील रस्ता खचला तर कापराई धरण ओहरफ्लो होऊन नदी नाल्यानं पूर आला आहे.

वाखारी चिंचबारी घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील खचलेला रस्ता तर दुसऱ्या छायाचित्रात रस्त्यावर वाहून आलेला दरडीचा ढिगारा (छाया – सोमनाथ जगताप )

आज शुक्रवारी( दि ८) रोजी देवळा तालुक्यातील पूर्व भागातील वाखारी चिंचबारी घाट परिसरात सुमारे एक ते दीड तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चिंचबारी घाटात दरड कोसळली असून, या दरडीचा ढिगारा रस्त्यावर वाहून आल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने घाटातील खचलेल्या रस्त्यालगत दगडगोटे व झाडांच्या फांदया टाकून सावधानतेचा इशारा दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here