चांदोरी
चांदोरीतील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शुक्रवार दि. १८ रोजी ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या मध्ये चित्रकला प्रदर्शन, शिवरायांच्या संबधित पोवाडे,वेशभूषा, लेझिम आदीं कार्यक्रमांचा समावेश होता.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रिया कंक्राले यांनी प्रतिमपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शिवरायांचे विचार, युद्धनीती,व्यवस्थापन,कावा,स्फूर्ती गीते,पोवाडे,किल्ले गड याबद्दल माहिती शिक्षकांनी आपल्या मनोगतात करून दिली.
शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून शिवराय व त्याच्या कार्याचा महिमा व्यक्त केला. वेशभूषा स्पर्धेत चिमुकल्याची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती.
शिवजयंती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. कोरोनानंतर झालेला ह्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेघा चव्हाणके, दीप्ती विप्रदास,शितल टर्ले,गायत्री टर्ले,ज्योती सूर्यवंशी,शितल वनारसे,सुचिता सूर्यवंशी, सप्ना खरे,रंजनी चव्हाण व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम