चांदवड महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

0
40

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य डॉ सौ संगीता आर बाफना यांनी दिली.

यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ.बाफना यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचे वर्णन करून त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी असे आव्हान प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी एम व्ही उपाध्ये यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट उलगडणारे मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य एस यू समदडीया तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here