चांदवड तालुक्यात चोर ‘ वस्तीवर ‘ अन् पोलिस ….?

0
31

नितीन फंगाळ
चांदवड : चांदवड येथील वरचे गाव परिसरातील गेल्या १५-२० दिवसापासून मोटारसायकल व घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली असून गुरूवार दि .२८ / ४ / २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास वरील परिसरातुन दोन – तीन मोटार सायकल चोरी गेलेल्या आहे .

तसेच पुढील महिन्यात शिंपी गल्ली परिसरात देवी आखाडी उत्सव होत आहे त्यावेळी देखील नागरीक हे घर बंद करून देवी आखाडी उत्सव बघण्यास घराबाहेर पडणार आहे त्यावेळी देखील घरफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे तातडीने याबाबीकडे गांभीयनि लक्ष देऊन परिसरात होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरीकांच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे .

परिसरात योग्य तो पोलीस बंदोबस्त करण्यात यावा याबाबत चांदवड पोलीस स्टेशन येथे उत्सव समिती व नागरिकांनी निवेदन देत पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासोबत चर्चा केली यावेळी मनोज बर्वे महेश बोराडे सचिन कोल्हार प्रशांत दळवी अंकुर कासलीवाल प्रशांत वासोळकर आदी नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here