विष्णू थोरे
चांदवड प्रतिनिधी : कोरोना काळात आई व वडील गमावलेल्या अनाथ तसेच पाच ते दहा किलोमीटर पायी शाळेत जाणाऱ्या गरजू व गरीब मुलांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप चांदवड तहसीदार प्रदीप पाटील,संगमनेर येथील साई समर्पण फाउंडेशनचे संस्थापक डॉ.संदीप अरगडे व आशिष ताजणे, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी,डॉ.भालचंद्र पवार,डॉ.सतीश गांगुर्डे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘हेल्पिंग हँड’ या ग्रुप ने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून अनेक मदतीचे जोडून समाजातील वंचित व गोरगरीब लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणारा, उपयोगी पडणारा ग्रुप म्हणून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनाथ व गरजू मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटपासाठी त्यांना चांदवड शहरातील अनेक मान्यवरांनी आर्थिक योगदान दिले.त्यात संगमनेर येथील समर्पण फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.संदीप अरगडे व आशिष ताजणे, डॉ.सुशीलकुमार शिंदे, डॉ.हेमराज दळवी, डॉ.शशिकांत गवळी, डॉ.विष्णू पालवे, डॉ.सतीश गांगुर्डे,डॉ.भालचंद्र पवार,सरुबाई भंडारे, राम गुंजाळ, मुक्तार शेख, संतोष सूर्यवंशी, मनोज कोतवाल, विवेक अग्रवाल, विशाल ललवाणी, प्रकाश खालेकर, संजय दादा तांबडे, किशोर शिंदे, राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी योगदान दिले.
कोराना काळात अनाथ झालेल्या डोंगरगाव येथील आशा पगारे, हर्षल पगारे या विद्यार्थ्यांना तसेच भाटगाव येथील कार्तिकी जाधव,गायत्री गांगुर्डे,गणेश माळी या गरजू मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू थोरे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षल गांगुर्डे यांनी केले.
याप्रसंगी चित्रकार देविदास हिरे,कवी रावसाहेब जाधव,राम क्षत्रिय,कवी सागर जाधव,पांडुरंग भाडंगे,विकी गवळी,पत्रकार धनंजय पाटील,राम बोरसे,नितीन फंगाळ, दीपक निकम, सुनील काळे, अमोल गांगुर्डे, नितीन ठाकरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम