चंपाषष्ठी स्पेशल प्रति जेजुरी दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र  रत्नगड 

0
41

वैभव पगार, म्हेळुस्के
द पॉईंट नाऊ स्पेशल : आज चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस , दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र  रत्नगड  हा प्रति जेजुरी म्हणून ओळखला जातो त्या निमित्ताने.

रत्नगड. व गडावरील गाभाऱ्यातील श्रीखंडोबा – म्हाळसा – बाणाई चे मनमोहक रूप

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. त्याचा हा उत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. मराठी माणसाचे कुलदैवत जेजुरी मानले आहे . परंतु दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील श्री क्षेत्र रत्नगड हे प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे. रविवारी गावातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख उपवास करतात.

मूळ मंदिर हे गडावर असून पायथ्याला पादुका आहेत. गडाच्या मध्यावर गणपती बापाचे मंदिर आहे. गड पूर्ण चढल्यावर पिवळा ध्वज मार्तंडभैरवाचे  मंदिर असून आत श्री खंडेराय व म्हाळसा बाणाई माता यांचे तेजस्वी , मनमोहक रूपाचे भक्तांना दर्शन होते. दूर वरून आलेल्या भक्तांना बसण्यासाठी गडाच्या पायथ्याशी भव्य गार्डन आहे.

येळकोट – येळकोट जय मल्हार च्या जय घोषात येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते .  खोबरे भांडाऱ्याच्या उधळणीने रत्नगड नाहून निघतो. रात्री बारावाजे नंतर ही दर्शन रांग सुरूच असते. दूर वरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथील बारागाड्या ओढण्याचा उसत्व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here