चंदेरी दुनियेमागील समोर येणारे वास्तव ?
देशात सध्या पोर्नोग्राफी प्रकरण वेगवेगळे वळण घेत चाललंय. त्यात आता या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा यांची पत्नी शिल्पा शेट्टीने मात्र आपल्याला यातलं काहीच ठाऊक नाही आणि माझे पती निर्दोष असल्याचं म्हटलंय.
एका बाजूला पोलिसांद्वारे वेगवेगळे पुरावे समोर येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र कुंद्रांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिल्पा शेट्टी द्वारे केला जातोय.
देशातील नामवंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखल्या जात असलेल्या, राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या एक ना अनेक बाबी वारंवार समोर येत असल्याने, बॉलिवूड बद्दल सामान्यांचा आकस देखील काहीसा वाढत जातांना दिसतोय.
सुशांतसिंग राजपूत प्रकरण, ड्रग्ज प्रकरण अशा अनेक गोष्टी या चंदेरी दुनियेच्या झाकलेल्या पडद्यामागून बाहेर येताय. म्हणून ही चंदेरी दुनिया आता कोणत्याही प्रकारे स्वच्छ राहिलेली दिसत नाही.
बॉलिवूड च्या या चंदेरी दुनियेतील हे पोर्नोग्राफी प्रकरण समोर आल्याने, आधीच ढळलेल्या बॉलिवूड च्या विश्वासार्हतेला अजून मोठा धक्का बसलाय. एका बाजूला अभिनेत्री शिल्पा शेट्टी योगाभ्यासाचे धडे देत असताना, तिचे प्रिय यजमान मात्र भलत्याच दुनियेत व्यग्र असल्याचे समोर आल्याने, शिल्पा शेट्टीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागतेय. शिल्पा शेट्टीचा आगामी चित्रपट बॉयकॉट करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसू लागल्याने, शिल्पा शेट्टीचे धाबे चांगलेच दणाणले. व्यवसायातून एवढी गडगंज श्रीमंती मिळवली असतांना, या मार्गावर वळण्याचे कारणच काय? की गलिच्छ विचारधारा यामागे आहे? अशी चर्चा होऊ लागलीय.
या अशा एक ना अनेक बाबी या चंदेरी दुनियेतून बाहेर येत असल्याने, या चंदेरी दुनियेच्या मोहात पडलेल्यांना अर्थात आपले करिअर बनवू पाहत असलेल्या नवख्या कलावंतांना देखील यामुळे मनात चलबिचल सुरू झाली असणार हे मात्र नक्की.
बॉलिवूड च्या भयावह वास्तवांनी लोकांसमोर देखील अनेक चित्र उभे केलेत. यामुळे बॉलिवूड च्या आगामी प्रोजेक्ट्स वर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम