द पॉईंट नाऊ ब्युरो : पुणे जिल्ह्यात एक अतिशय घृणास्पद घटना घडली आहे. एका महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न झाल्याची लाजिरवाणी घटना सुसगाव येथे घडली आहे. यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही आपल्या सासऱ्यांसोबत चुलत सासऱ्यांकडे गेल्यावर त्यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता, याचा राग येऊन या घटनेतील आरोपींनी सासऱ्याला एका खोलीत कोंडून लघवी पाजण्याच्या प्रयत्नाचे हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. याबाबत हिंजवाडी पोलीस ठाण्यात चार महिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर महिलेच्या सासऱ्याला एका खोलीत कोंडून तिला लघवी पाजण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम