स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : ता.१३ बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. निवडणुकीत उपसरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. पहिला दादाजी जाधव व दुसरा नंदकुमार भामरे यांचा उमेदवारी अर्ज करण्यात आले होता. निवडणूक प्रक्रियेत अर्जांची छाननी केली असता नंदकुमार भामरे यांनी आपल्या अर्जाची माघार घेतल्यामुळे एकमेव दादाजी तानाजी जाधव यांचा शिल्लक राहिल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांनी कामकाज पाहिले. त्यावेळेस उपस्थित सरपंच सुनिता गायकवाड, माजी उपसरपंच समाधान मोरे, सदस्य तात्याभाऊ बोराळे, दादाजी अहिरे तसेच सदस्य प्रमिला भामरे, कल्पना नेरकर, क्रांती भामरे, रेखा भामरे, उज्वला सोनवणे तसेच संपूर्ण गावातील प्रतिष्ठित नागरिक दिपक भामरे, महेंद्र भामरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे केशव सोनवणे संभाजी भामरे राकेश मोरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम