गोव्याच्या दारूत उत्तर महाराष्ट्राची अंघोळ ; अधिकारी मात्र सुस्तीत

0
38

नाशिक प्रतिनिधी : दारू म्हटलं की तळीराम आनंदात न्ह्याहून निघत असतात, राज्यात प्रतिबंध असलेल्या इतर राज्यातील दारु नाशिक जिल्ह्यात राजरोजपणे विकली जातेय. अक्षरशः महापूर असल्याचे चित्र जिल्ह्याभरात आहे. अधिकारी कारवाईमध्ये कसूर करत असल्याने दारू साम्राटांचे इतकं फावले आहे. नुकतेच राज्य उत्पादन विभागाने येवला- मनमाड मार्गावरील सावरगाव शिवारात कारवाई केली. यात ट्रक चालक- मालकासह पाच जणांना बेड्या ठोकल्या त्यानंतर याचा पदार्फाश झाला. आज ही कारवाई झाली मात्र हा विषय तडीस जाणार का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

आज राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दिनेश मानाराम बिश्‍नोई (बिकानोर, राजस्थान), प्रदिप नरोत्तम जयस्वाल (चिंचपाडा, नवी मुंबई), विश्‍वास बापुराव पाटील (रा. विटावा, ठाणे), हितेश सुर्यकांत रहाटे (वागळे इस्टेट, ठाणे) व रमेशकुमार बिलबलराव बिश्‍नोई (बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. यात मोठे मासे गळाला लागण्याची देखील शक्यता आहे. या वाहतूकीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानुसार राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप आणि संचालक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत मुख्यालयातून आलेल्या आदेशान्वये विभागीय भरारी पथक, येवला निरीक्षकांचे भरारी पथक आणि नंदूरबार अधिक्षकांचे पथक कामाला लागले होते. त्यानंतर पथकांनी सावरगाव (ता. येवला)शिवारातील हॉटेल मानससमोर सापळा लावून वाहन तपासणी केली असता, दारूसाठ्याची वाहतूक करणारे पथकाच्या हाती लागले. या कारवाईत आयशर ट्क (एमएच ४३, बीएक्स ०९०७) सह विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याचा सुमारे ५० लाख ४९ हजार ५०० रूपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. विभागीय पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही. एम. पाटील यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

प्रतिबंधीत दारुचे बस्तानकाही दिवसांपासून नाशिक विभागात मोठ्या प्रमाणात मद्य विक्री आणि वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. दिव-दमणसह केंद्रशासित गोवा आणि दादरा हवेली येथील मद्याची राजरोसपणे विक्री व वाहतूक होत आहे. केंद्रशासित राज्यांच्या सिमावर्ती भागातून हा साठा नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि नगर या जिल्ह्यांत वितरीत होत असल्याची माहिती आहे. मात्र अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याने अवैध धंदे चालकांचे फावले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here