द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तहसील कार्यालया समोरील खचलेल्या रस्त्याची बातमी ‘द पॉईंट नाऊ’ ने काल प्रसिद्ध केली होती. यानंतर 24 तासाच्या आतच प्रशासनाच्या मदतीने जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर व सुनील (गोटु आबा) आहेर यांनी लक्ष घालून काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला सत्यात उतरवत आबांनी प्रशासनाच्या मदतीनं काम पूर्ण केल्याने नागरिकांनी ‘आबांचे’ व ‘द पॉईंट नाऊ’ ने आभार मानले आहेत.

तहसील कार्यालया समोरच असलेली चारी लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता होती. अनेकवेळा छोटे अपघात देखील झाले. या रस्त्याची वेळोवेळी तक्रार करूनही काम होत नव्हते. अनेक वाहन चालकांनी द पॉईंट नाऊ कडे तक्रार केल्यानंतर याची बातमी प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध होताच 24 तासाच्या आत गोटु आबांनी दखल घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सध्या माती टाकून काम करण्यात आले आहे. मात्र भविष्यात डांबरीकरण करू असे आश्वासन आहेर यांनी दिले. त्यांच्या या कर्तबगारीने राजकीय नेते शब्दाला जागतात याची जाणीव नागरिकांना आली. सर्वच नेतेमंडळी इतकी तत्पर झाल्यास समस्या उरणार नाही हे देखील खरे.
मी जनतेचा सेवक – सुनील आहेर (गोटु आबा)
मी जनतेचा सेवक आहे, मला अनेक नागरिक फोन करत असतात, त्यांच्या तक्रारी मी शक्य तितक्या लवकर पूर्ण करतो. जिल्हा परिषदेच्या गटा पुरते मर्यादित न राहता, शेजारील तालुक्यातील समस्या देखील मी सोडवत आहे. जनतेच्या सेवेसाठी मी माझे आयुष्य वाहून घेतले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम