‘गेला माझा सख्खा नवरा गेला’ ; भारुडाने ग्रामस्थ भारावले

0
193

दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या खेळीमेळीत उत्साहादायी वातावरणात पार पडली.
सकाळी काकडा आरती झाल्यानंतर नऊ वाजता प्रसिध्द कीर्तनकार मनोहर महाराज घोडे यांचे काल्याचे प्रेरणादायी कीर्तन झाले.यानंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. तद्नंतर गावातून दिंडी काढण्यात आली. यादिंडीत सर्व ग्रामस्थ महिला सहभागी होत्या. गावातील सर्व ग्रामस्थांनी आकर्षक रांगोळीने दिंडीतील भाविकांचे स्वागत केले. यात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे सर्व सहभागी महिला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात रांगोळी स्पर्धेत सहभाग दर्शविला.

सात दिवस अखंडपणे सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहात सात दिवस गावातील महिलांनी अखंडपणे पारायण केले. आठ दिवस अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत सकाळ आणि सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर भाविकांना भोजनाचा आस्वाद दिला. महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज कीर्तनकारांनी हजरी लावत आपापल्या कीर्तनातून समाजप्रभोधन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत मुखपट्टी आणि सामाजिक अंतर राखत हा हरिनाम सप्ताह पार पडला.

जेष्ठ प्रवचनकार प्रकाश महाराज कदम यांनी “गेला माझा सख्खा नवरा गेला” या विनोदी आणि भावी पिढीसाठी प्रेरणात्मक असलेल्या भारुडाने भाविक भक्तगण,गावातील ग्रामस्थ रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालत सर्वांची मने जिंखली.
“गेला माझा सख्खा नवरा गेला या भारुडात एकविसाव्या शतकात महासत्ता बनू पाहणाऱ्या भारत देशाची तरुण पिढी आणि भावी पिढीसाठी तरुणांचे असलेले सध्याचे योगदान,आणि मोबाईल नेटवर्क सोशल मीडिया यांसह मद्यधुंद होत व्यसनाधीन होऊन वाया गेलेली सध्याची तरुणाई याचे प्रकाश महाराज कदम आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी आपल्या भारुडातील प्रभोधनातून समाज जागृती केली.

यानंतर सर्व गावातील नवविवाहित दाम्पत्य,यांसह ग्रामस्थ नागरिकांनी राधा कृष्ण राधा,आली आली हो भागाबाई, खेळू फुगडी बाई,खेळू भवरा बाई ग खेळू भवरा बाई या चरणावर टाळ पखवाज यांच्या गजरात फुगडी,भवरा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. यानंतर सामूहिक दहीहंडी काला कार्यक्रम पार पडला.

पुरोहित रमेश बेलगावकर यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची शेवटच्या दिवसाचा महाप्रसाद महापंगत दिली. सर्व गावातील ग्रामस्थ नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करत या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता पार पडली.या अखंड हरिनाम सप्ताहाला गावातील लहान थोर सर्व ग्रामस्थ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दर्शविला यामध्ये गावातील लहान मुले आणि महिलांची संख्या लक्ष्यवेधी ठरली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here