गुणरत्न सदावर्तेच्या न्यायालयीन मुक्कामात वाढ

0
12

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते न्यायालयीन कोठडीत आहेत.छत्रपती घराण्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाली होती. न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारे आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी आरोपी असलेले सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाली होती. 18 एप्रिल रोजी सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली आहे. तर आज 18 एप्रिल रोजी कोठडीतून कोर्टात हजर करण्यात आले होते. सातारच्या न्यायालयात सुमारे सायंकाळी 5 वाजता हजर करण्यात आले. यावेळी सत्र न्यायालायने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आली.

सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित केले, मराठा समाजाचा अपमान केला. दरम्यान, मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त सदावर्तेयांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here