सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गुंजाळनगर ता.देवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास नाशिकहून साक्रीकडे जाणाऱ्या एसटी बसने चिरडल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अनिल एकनाथ पानपाटील (वय ३०) रा.गुंजाळनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,साक्री आगाराची बस (एम.एच.१३ सी.यू.७३०६) नाशिकहुन साक्रीकडे जात असतांना गुंजाळनगरजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बोगद्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या अनिल पानपाटील या पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
लहुजी शक्ती सेनेचे दिपक पानपाटील यांचे ते बंधू होत. या घटनेमुळे वाहनांची वेगावर नियंत्रण नसल्याबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत तरुणाचे मामा रमेश सुखदेव साबळे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ,देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी ,शरीफ शेख ,अरुण आहिरे करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम