गिरीश भाऊंना बुधवार पेठेत पाठवा…! ; नाथाभाऊंचा कमरेखालचा हल्ला

0
14

जळगाव ब्युरो : जळगाव जिल्ह्याचे दोन्ही राजकीय पहिलवान नाथाभाऊ अन गिरीश भाऊ सध्या आखाड्यात लंगोट सोडून कुस्ती खेळताय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांनीही भाषेची पातळी सोडली असून राजकीय कलगीतुरा सध्या जळगावात रंगला आहे.

‘कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मला ठाण्याला जाण्याची गरज नसून उलटपक्षी गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. कोरोनावरून खडसे आणि महाजन या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा आता पेठे पर्यंत पोहचल्याने नागरिकांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत.

कालच नाथाभाऊंनी ‘मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?’ असा प्रश्‍न केल्यानंतर आ. महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून नाथाभाऊंनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच रस्ता दाखवल्याने नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.

नाथाभाऊ तसे सडेतोड नेते आहेत मात्र त्यांनी आता या शब्दात बोलणं म्हणजे कार्यकर्त्यांना विनोदाची मेजवानी तर वैचारिक लोकांना चीड असच आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here