गिरणारे येथे अज्ञात व्यक्तींचा हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

0
42
खैरनार यांच्यावर हल्ला झाला ते ठिकाण. (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील गिरणारे शिवारातील धिंडेश्वर मळ्यात वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी रात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला. यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला मालेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

खैरनार यांच्यावर हल्ला झाला ते ठिकाण. (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिरनारे येथील धिंडेश्र्वर मळ्यात चिंतामण गटलू खैरणार ( वय ४५) हे आई, वडील, पत्नी, चार मुली यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. बुधवार दिनांक १२ रोजी ते घराबाहेरील पडवीत झोपलेले असताना रात्री साडे अकराच्या सुमारास अज्ञात दोन इसमांनी खैरनार यांच्यावर प्राणघातक शास्त्रांनी हल्ला केला. यात त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यावेळी त्यांच्या आईने आरडाओरड केल्याने उर्वरित कुटुंबीय घराबाहेर आले. जखमी अवस्थेत त्यांना मालेगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ पाठवण्यात आले असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे, उपनिरीक्षक विक्रांत कचरे, निलेश सावकार, विजय सोनवणे, मोठाभाऊ बच्छाव आदी करीत आहेत.

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून हल्ल्याचे कारण अस्पष्ट असल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here