एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मराठा आरक्षणासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोल्हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्यांना आता कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सातारा पोलिसांच्या अटकेनंतर सदावर्ते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करून मुंबईला दाखल केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आज गिरगाव न्यायालयाकडून शाहुपुरी पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाला आहे. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूरच्या शाहुपुरीत गुन्हा दाखल आहे. ऍड. सदावर्ते यांचा साताऱ्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी ताबा घेतला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचार्यांकडून प्रत्येकी २०० ते ३०० रुपये घेतल्याची कबुली दिली आहे, मात्र हे पैसे एसटी कर्मचार्यांनी आपल्या मर्जीने दिल्याचा दावाही सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला आहे. विविध पोलीस ठाण्यातून सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम