द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील वडाळा हर गाव सध्या आपल्या आध्यात्मिक बाबींमुळे चर्चेत असते, धार्मिक सण , उत्सव, सप्ताह, असे सर्वच हिंदुधर्मीय सण उत्सव येथील युवा वर्ग मोठ्या जोशात सहभागी होत साजरा करत असतात.
वडाळा या लहानशा गावात दरवर्षी प्रमाणे युवकांनी पुढाकार घेऊन अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. 11 वे वर्ष असून यात युवकांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने ग्रामस्थ देखील समाधानी आहेत.
अजूनही ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय जपला जातो. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने गावातील तरुण एकत्र येवून दरवर्षी मोठ्या उत्साहाने अखंड हरिनाम सप्ताह पार पाडतात. तसेच एक गाव एक गणपती याची प्रेरणा घेवून दर वर्षी गावातील तरुण एकत्र येऊन गणपती स्थापन करतात.
– किरण प्रदीप सोनवणे (ग्रामस्थ वडाळा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम