जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्रातील गावागावात अवैध धंद्यांना उत आलेला आहे. गावठी दारू गाळून अवैध धंदे जोमात सुरू आहेत. ग्रामपंचायतीचे स्थानिक धागेदोरे आहेत तर पोलिसही कारवाई करत नाही. यामुळे संतप्त झालेय महिलांनी दारूच्या बाटल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर फोडल्या. इतकेच नाही तर विक्री करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यावही हल्ला करणार असल्याचा इशारा दिला आहे.
गावागावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिस कारवाई करीत नसल्याचा महिलांचा आरोप आहे. या दरम्यान वावडदा जळगाव परिसरात देखील अशाच प्रकारे गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने अनेक तरुण याच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने गावातील महिलांनी आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
आज संतप्त महिलांनी व्यथा मांडताना दारू पिण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन नवरे पैसे मागतात. घरात भांडण होतात, नाही दिले तर घरातील वस्तू, अन्न, धान्य विक्री करून दारू पितात. मजुरी करून आणलेले पैसेही जात असल्याने कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करावा असा प्रश्न आहे. यामुळे आता गावात दारू अथवा अवैध धंदे चालू देणार नाही. गावात कोणी दारू विक्रीचा किंवा पिण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही इंगा दाखविल्या शिवाय राहणार नाही. असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला.
संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून दारूच्या बाटल्या फोडून निषेध नोंदविला. शिवाय आता गावात कोणी दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर हल्ला चढविल्याशिवाय राहणार नाही. असा निर्धार देखील महिलांनी यावेळी केला. महिलांचा हा संताप पाहता ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून गावात दारूबंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम