देवळा : ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन गट नेते संभाजी आहेर यांनी आज मंगळवारी (दि . २६) रोजी कणकापूर येथे केले .
कणकापूर ता देवळा येथे राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था तसेच युवा मित्र संस्था सिन्नर , टाटा ट्रस्ट, घारडा केमिकल्स यांच्या संयुक्त विद्दमाने जलसमृद्धीतुन विकास कार्यक्रमांतर्गत गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी(दि२६) रोजी करण्यात गट नेते संजय उर्फ संभाजी आहेर यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी ते बोलत होते . तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर गावात गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यात परिसरातील नदी नाले ,छोटे मोठे पाझर तलाव यातील गाळ उपसा उपक्रम राबविण्यात येत आहे . याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे . गाळ उपसा मुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन , शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे .
याकामी कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहूउद्देशीय संस्थेने हाती घेतले काम प्रेरणादायी असून, यासाठी आपण संस्थेला मदत करण्यास तयार असल्याचे शेवटी गट नेते आहेर यांनी यावेळी सांगितले . या उपक्रमात आजूबाजूच्या गावातील सहभागी होऊन गाळ उपसा करून घ्यावा . पहिल्या टप्प्यात गावातील गंधर्व नाला , बाह्मण डोह सिमेंट बंधारा , पाणकाळ धरण व मंगळवारी चौथ्या टप्प्यात गाव तलाव खोलीकरण व रुंदी करणाचे काम सुरू करण्यात आले आहे .
याप्रसंगी युवा मित्र चे तालुका समन्वयक सागर गुंड, अक्षय काळे , नानु आहेर, बाबाजी पाटील , जगन्नाथ मीस्तरी , पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष जगदीश शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, रवि बर्वे, शिवा बर्वे, साहेबराव सावकार, संजू बर्वे, संजय शिंदे, निवृत्ती शिंदे, शशिकांत शिंदे, धनाजी शिंदे, मुकेश महाराज, योगेश शिंदे, मधुकर शिंदे, संजय जैन, दौलत जैन, दशरथ मोहिते, आबा शिंदे, साहेबराव मोरे, भाऊसाहेब शिंदे, सोमनाथ जगताप ,प्रकाश शिंदे, सुरेश बर्डे, बंटी बर्वे आदींसह शेतकरी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम