द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सध्याच्या परीस्थितीमध्ये गेल्या दिड वर्षापासून आपण सर्वजन कोरोना सारख्या महामारीशी लढा देत आहोत, सर्वत्र लॉकडाउन मुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. पण काही ठिकाणी असेही विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांकडे पुरेशे शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाहीये..आशा गरजु आणि होतकरु विद्यार्थ्यांना तुमच्या मदतीची गरज आहे.
गणपती बाप्पा चरणी 1 वही 1 पेन हा उपक्रम तेजोमय फाउंडेशन आणि व्हिजन अकॅडमी गेल्या 5 वर्षंपासून राबवत आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अनेक गरजु विद्यार्थ्यांना बाप्पाचा हा शैक्षणिक प्रसाद मिळाला आहे.
यंदाचाही गणेश उत्सव आपण सामाजिक बांधीलकी जपुन साजरा करूया ” श्री गणेशाच्या चरणी अर्पण करूया १ वही १ पेन”.
उपक्रमाचे स्वरूप असे कि गणेश उत्सवामध्ये गणपतीला भाविकांनी एक वही व एक पेन अर्पण करून प्रार्थना करावी.ती वही आणि पेन *तेजोमय फाऊंडेशन व व्हिजन अकॅडमी,निफाड* गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवतील.
चला तर मग,विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला वही आणि पेन अर्पण करूयात आणि ती वही आणि पेन बाप्पाचा प्रसाद म्हणून गरजू विद्यार्थ्यांना देऊयात.
➡️गौरव कर्डिले 9921560722
➡️परवेझ अत्तार 9960796852
➡️विलास गायकवाड 9921133303
➡️ज्ञानेश्वर नवले 8308363993
आमच्या या उपक्रमात आपण ऑनलाइन देणगी पाठवून देखील सहभागी होऊ शकता…
फोन पे, गुगल पे नंबर 9921560722
पत्ता:व्हिजन अकॅडमी,2रा मजला,शरद जोशी संकुल,माकडबाबा चौक निफाड.422303
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम