खुंडेवाडीत शनीवार पासून यात्रोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
12

देवळा प्रतिनिधी : खुंटेवाडी ता देवळा येथे पारंपरिक पद्धतीने शनिवार ( दि .२) रोजी ग्रामदैवत शंभू महादेव यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पगार यांनी दिली .

खुंटेवाडी गावांत पारंपरिक पद्धतीने शनिवार (२) रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी आठ वाजता शंभू महादेव मंदिरात माजी सरपंच भाऊसाहेब पगार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा आयोजित करण्यात आली आहे . त्यानंतर सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पप्पू सावकार भगत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .

रविवारी( दि. ३) रोजी दुपारी भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे . यात मानाच्या कुस्तीला गदा व रोख दोन हजार ५०१ रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असून ,याचा कुस्ती पहिलवानांनी लाभ घ्यावा . तसेच रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे . याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पगार ,माजी सरपंच भाऊसाहेब पगार ,प्रा . बी के रौंदळ , शिवमन भामरे ,विनोद पगार ,निलेश भामरे ,अनिल भामरे ,जिभाऊ भामरे ,भाऊसाहेब भामरे ,सुधाकर ,माळी , कारभारी गायकवाड ,सुनील पगार ,पप्पू भामरे ,विकास भामरे ,तंटा मुक्तीचे अध्यक्ष निंबाजी भामरे , एन एस भामरे , पोलीस पाटील कल्पना भामरे , ग्रामपंचायत कर्मचारी अनिल भामरे ,गणू भामरे आदींनी केले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here