देवळा प्रतिनिधी : खुंटेवाडी ता देवळा येथे “एक दिवस एक गाव” अभियानांतर्गत वीज वितरण कंपनीच्या देवळा उपविभागातर्फे महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर , मालेगावचे अधिक्षक अभियंता आर एस सानप ,कार्यकारी अभियंता कळवण विभाग रामराव राठोड याच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबविण्यात आली .
सदर अभियानांतर्गत महावितरण वीज देयक दुरुस्ती, नवीन वीज जोडणी , नादुरूस्त मीटर बदलणे , देखभाल व दुरुस्ती करणे आदी समस्यांचे गावातच निराकरण करण्यात आले . सदर अभियानांतर्गत उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी कृषी वीज धोरण 2020 महावितरण सेवा , ग्राहक कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले .
कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत देवळा उपविभागात कृषी पंप ग्राहक संख्या 14353 असुन, थकबाकी 120 कोटी रुपये इतकी आहे. या पैकी एकूण 8107 कृषी ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवून 15 कोटी 24 लाख रुपये कृषी वीजबिल भरले . तर 2687 कृषी ग्राहकांनी 8.35 कोटी रुपये बिल भरून सदर योजनेचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त केली आहे .अशा ग्राहकांचा महावितरण कंपनीने सन्मान केला.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना दर्जेदार सेवा , अखंडीत वीज पुरवठा , देखभाल व दुरूस्ती याचे कोटेकोर पालन करून जास्तीत जास्त उत्तम सेवा देण्याचे आश्वासन दिले. उर्वरित कृषी ग्राहकांनी या योजनेचा मार्च अखेर फायदा घेवुन थकबाकी मुक्त होण्याचे आवाहन बंकट सुरवसे यांनी केले .यावेळी माजी संरपंच भाऊसाहेब पगार यांनी अतिरिक्त रोहित्रावरील भार कमी करून नवीन रोहित्र बसवावे . ग्राहकांना दर्जेदार सेवा दयावी, देखभाल व दुरुस्ती वेळेवर करावी, जुन्या खराब विदयुत तारा बदलन्यात याव्यात जेणेकरून अपघात होणार नाही .शेतक – यांना दिवसा वीजपुरवठार दयावा याबाबत आग्रही मागणी केली . देवळा येथील अधिकारी, कर्मचारी चांगली सेवा देत असून , ग्रामस्थांनी अनधिकृत विदयुत जोडणी अधिकृत करून घ्यावी जेणेकरून अधिकृत ग्राहक यांना विनाकारण त्रास होणार नाही तसेच महावितरणचे पण नुकसान होणार नाही . अशी सूचना केली. यावेळी रविंद्र आर . खाडे , वरिष्ठ तंत्रज्ञ गुलाब आहेर , निलेश भामरे , चेतन भामरे आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम