द पॉईंट नाऊ ; आरक्षण या मुद्द्यावर आता MIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे.
यामुळे आता आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मागील बऱ्याच काळापासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण असे मुद्दे समोर आलेत.
ज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावर तर मराठा समाजा द्वारे वारंवार आक्रोश व्यक्त केला जातोय.
यासाठी मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी आरक्षण याअंतर्गत मोर्चे देखील काढले गेले.
त्यात आता खासदार ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारला “आम्ही देखील रस्त्यावर उतरायचे का?” असा सवाल केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्या बाबत सांगितले आहे. त्यात आम्ही विचारल्यावर आम्हाला जातीयवादी ठरवले जाते.
आणि तुम्ही स्वतः मात्र अन्याय करता. असा आरोप ओवैसी यांनी केला आहे.
मुस्लिम समाजाला अद्याप राज्यात आरक्षण नाही. मुस्लिम समाजाला शिक्षणात 4% आरक्षण देण्याची मागणी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
एक नव्या वळणामुळे आता महाविकास आघाडी सरकार समोर पेच उभा राहणार असच दिसतंय.
आधीच मराठा आरक्षण मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक आहे. त्यात धनगर समाजाला देखील आरक्षण देण्याची मागणी केली जातेय.
आणि आता ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्या बाबत विचारणा केल्याने, महाविकास आघाडी सरकार समोर मोठा पेच उभा राहिला आहे.
न्यायालयाने मुस्लिम समाजातील पंधरा जातींना आरक्षण द्यायला सांगितले आहे. ते पूर्ण करा. असं ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारला सांगितलं आहे.
खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.
1. पाच एकरपेक्षा अधिक शेती असणारे मुस्लिम किती?
2.किती टक्के मुस्लिमांना बँका आणि सोसायट्यांतून कर्ज मिळते?
3. किती टक्के मुस्लिम झोपडपट्टीत राहतात
4. किती मुस्लिम पदवीधर आहेत?
5. किती मुस्लिमांच्या शाळा आहेत?
ओवैसी यांनी हे पाच प्रश्न विचारून महाविकास आघाडी सरकारला अन भाजपला एक प्रकारचा टोला लगावला आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षण बाबत विधेयक आणून, निर्णय घेण्यात येऊन, मुस्लिमांना आरक्षण बहाल करण्यात यावं.
न्यायालयाचा आदेश पाळावा. अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे.
संसदेत आता कायदा मंजूर झाला आहे. न्यायालयाने मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास नसल्याचं म्हटलं आहे.
तर मुस्लिम समाज हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मग असं असतांना, तुम्हाला अडवतं कोण? मराठा आरक्षणावर तुम्ही बोलता. मग मुस्लिम आरक्षण बाबतच का बोलत नाही? हा अन्याय का करता?
असे अनेक सवाल करत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकार ला धारेवर धरले आहे.
आता याबाबत महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेते? आणि कधी? याचीच सारे वाट बघताय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम