देवळा प्रतिनिधी ; तालुक्यातील महालपाटणे ,चिंचवे , खालप ,शेरी -वार्शी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी ( २३ ) रोजी अखेरच्या दिवशी येथील सहायक निंबंधक कार्यालयात इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते .
सोसायटी निहाय प्राप्त अर्ज कंसात पुढीलप्रमाणे , महालपाटणे ( ३९), चिंचवे ( ५२ ) ,खालप ( ४५) , शेरी ,वार्शी ( २३) याप्रमाणे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत . या अर्जाची उद्या मंगळवारी ( २४ ) रोजी छानणी करण्यात येणार आहे ,तर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध (२५ मार्च ),माघार( ८ एप्रिल ), अंतिम यादी व चिन्ह वाटप (११ एप्रिल ),मतदान व मतमोजणी ( २३ ) होणार आहे . अशी माहिती सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम