खामखेडा येथे चोरट्यांचा डल्ला ; मध्यरात्री घर लुटले

0
72

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तालुक्यातील खामखेडा येथे घराच्या छताचे कौल उचकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत रोख रकमेसह 75 हजारांचा लूट काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरी प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळा पोलीस अधिक तपास करत आहेत, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खामखेडा येथील गट नं 111 मध्ये राहणारे शेतकरी भाऊसाहेब महादू शेवाळे यांच्या घरात झोपलेले असतांना  चोरट्यांनी छताचे कौल उचकवून घरात शिरले, घरात खिशातील पंधरा हजार रुपये आणि कपाटाचे लॉकर तोडून हजार रुपये रक्कम तसेच १० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असे एकूण ७५ हजारांची चोरी झाली आहे.

देवळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस कर्मचारी बाळू पवार, प्रकाश सोनवणे आदी करत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here