भाजीपाल्या बरोबरच इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही 50 रुपयांची वाढ झाली आहे. अशात आता खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहे. स्वयंपाक घरातील गृहिणींना चांगलीच फोडणी बसणार आहे.
सामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे तेलाच्या आयातीवर निर्बंध लागले आहेत.तर इंडोनेशियाकडून होणार पामतेलाचा पुरवठा ठप्प झाल्याने खाद्यातेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. सूर्यफूल बियांच्या विदेशात विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.शेंगदाणा, मोहरी, खोबरे,करडी बर्याच प्रकारची तेल मिळतात.
रशियाकडून भारताला होणारा खाद्यतेलाचा साठा मर्यादित आहे. भारत सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सवलतींसाठी रशियाशी संपर्क साधणार आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान खाद्यतेलाच्या देशांतर्गत किरकोळ किंमतीत वाढ होताना दिसते. त्यामुळे किंमती अजून वाढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम