स्वप्निल अहिरे,
आराई प्रतिनिधी : पोलीस म्हटले की, सुतावरून स्वर्ग गाठणार हे ठरलेलेच पण तो कसा गाठायचा हे सटाणा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राहुल गवई यांच्या कडुन शिकावे. अशीच उल्लेखनीय कामगिरी पुन्हा सटाणा पोलीस स्टेशनचे दुय्यम पथकाने करून एटीएम मशिन फोडणाऱ्या भामटयास सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर अवघ्या काही तासांतच संशयीत आरोपीला गजाआड केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि ३१ डिसेंबर च्या रात्री पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई हे आपल्या सहकारी पथकासमवेत गावात गस्त घालत होते. रात्रीच्या वेळी त्यांना एक युवक फिरतांना त्यांना आढळून आला होता. पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी त्या तरुणास हटकून त्या तरुणाची कसुन चौकशी करत त्याला हकलले देखील होते आणी त्याच वेळी मालेगाव रोडवर असलेले स्टेट बँकेचे ए टी एम मशिन फुटले होते. मशीन फुटले पण किती रक्कम गेली होती हे समजत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.
एटीएम मशिन फुटल्याचे समजतात वरीष्ठ अधिकारी यांच्या बरोबरच सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई पोलीस नाईक प्रकाश शिंदे, अजय महाजन, जिभाऊ पवार, कर्मचारी बनुसकर, दौंदै मेजर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती व परिसरातील सिसिटीवी फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी सिसिटीवी बघत त्यांच्या चाणाक्ष नजरेतून एक युवक त्या एटीएमच्या जवळ घुटमळत उभा असल्याचे दिसले व काही वेळाने त्याने आपल्या मोटारसायकल मधून काही तरी वस्तु काढून आत मधे गेल्याचे दिसत होते. किरण पाटील व राहुल गवई यांनी आपले सर्व कसब पनाला लावून एटीएम फोडणारा आरोपी व काल रात्री राहुल गवई यांना भेटणारा तरुण हा एकच असल्याचे राहुल गवई यांच्या नजरेने पक्के हेरले होते.
पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांनी काही क्षणात त्या तरुणाचा मागोवा काढत तो देवळा तालुक्यातील खामखेडा येथील लायकेश्वर वस्तीवर असल्याचे समजल्यानंतर तात्काळ धाव घेत तेथील जवळ असलेल्या जंगलातून त्या संशयीत आरोपीला पडण्यास यश मिळविले.
राकेश भाऊसाहेब बस्ते ( रा दहीवड ता देवळा. वय १९ ) हे आरोपीचे नाव असून हल्ली देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वास्तव्य करीत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील व पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई यांच्या बहारदार कामगिरीने पुन्हा एकदा दुय्यम पथकाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम