द पॉईंट नाऊ ब्युरो : आधी बारावी आणि आता दहावीचा पेपर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर येथे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा विज्ञान भाग 2 चा पेपर आहे. मात्र हा पेपर विद्यार्थ्यांना रात्रीच हाती पडल्याचे सांगण्यात येत आहे. आणि यासाठी विद्यार्थ्यांकडून 500-500 रुपये घेण्यात आल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याआधी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे देखील पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात आता दहावीचा देखील पेपर फुटल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. पेपर फुटीच्या अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मात्र नाहक नुकसान होत असल्याचेच दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम