द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपूर येथे एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका नामांकित शाळेत कंडक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या 41 वर्षीय दीपा दास यांची आधी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये गुंडाळून तो फेकून देण्यात आला. उप्पलवाडी रोड वर हा मृतदेह प्लास्टिक बॅग मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नागपूर मध्ये मागील काही दिवसांत खडलेल्या हत्येच्या घटनांमुळे नागपूर हादरून निघाले आहे. प्लास्टिक बॅग मध्ये गुंडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यात तपास केला असता, एका नामांकित शाळेच्या बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या दीपा दास यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम